काँग्रेस कमिटीच्या मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरी पदी सतीश विठ्ठल मोठे यांची निवड

प्रतिनिधी:- विजय पाटील

(local news) जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश विठ्ठल मोटे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र अॅडव्होकेट रवी प्रकाश जाधव चेअरमन विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने व सहीने करण्यात आली.

या निवडीसाठी कोल्हापूरचे काँग्रेस नेते ,शेतकरी व कामगार नेते माननीय संजय दिनकर पाटील यांचे सहकार्य लाभले.या निवडी बाबत बोलताना सतीश मोठे म्हणाले माहिती अधिकार कायदा सक्षम करणे लोकांना जागृत करणे त्याचबरोबर मानवाच्या मूलभूत असलेल्या तीन गरजा म्हणजे अन्न,वस्त्र व निवारा याबाबत मानवाधिकाराचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी हस्तक्षेप करून वंचितांना न्याय देणे असे काम भविष्यात केले जाईल. (local news)

निवड झाल्यानंतर शुभेच्छा देताना शिरोळ दत्त सहकारी साखर कारखाना चेअरमन गणपतदादा पाटील व नगरसेवक नितीन बागे तसेच दलित सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई ,आणि सामाजिक कार्यकर्ते नईम शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *