उन्हाळ्यात केसं कापणे किती योग्य?

उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांकडे केसांची स्टाईल करण्याची अनेक कारणे असतात. काहीजण सुट्टीसाठी जात असतात तर काही लग्नसमारंभात व्यस्त असतात. मात्र, या ऋतूमध्ये त्वचेच्या काळजीसोबतच केसांच्या स्टाइलमध्ये काही बदल लक्षात ठेवायला हवेत. जसे की केस वारंवार न धुणे मात्र केसांना कोमट किंवा जमल्यास त्यापेक्षा थंड पाणी घेणे. तसेच वारंवार आयनिंग करणं टाळणे यासारख्या काही महत्वाच्या आणि बेसिक गोष्टींमध्ये बदल केल्यास केसाचं आरोग्य राखू शकाल. चला जाणून घेऊया गरमीत केसांच्या काळजीकरता कोणत्या चुका टाळाव्यात.

तुमच्या नैसर्गिक केसांच आरोग्य या ऋतूत टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे कोणत्याही कॉसॅटिक्सचा वापर न करता तुम्ही नैसर्गिक केस जपणं गरजेचं आहे. अशावेळी खालील 6 चुका कटाक्षाने टाळा. जेणे करून तुम्ही अतिशय चांगले केस मिळू शकाल. केसांच्या बाबतची दररोजची सवय तुम्हाला गरमीत त्रास देऊ शकते.

केस अतिशय छोटे करणे

कडक उन्हाळ्यात अनेक स्त्रिया केस लहान करतात. पण केस लहान करताना हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की हेअरकट उन्हाळ्यासाठी अनुकूल असावे. फ्रिंज हेअर लूक किंवा मानेचे केस चेहऱ्यावर वारंवार येतात आणि यामुळे मुरुमांची समस्या तसेच उन्हाळ्यात त्रास वाढू शकतो. उन्हाळ्यातही कपाळावर मुरुम येऊ शकतात हे लक्षात ठेवा.त्यामुळे असा हेअर कट करणे टाळा. हेअर कटसोबतच उन्हाळ्यात शॅम्पू आणि तेलाकडे विशेष लक्ष द्या.

​शॅम्पू सर्वाधिक आणि कंडिशनर कमी करणं टाळा
व्यायाम केल्यानंतर, स्वयंपाकघरात काम करताना किंवा ऑफिसला जाताना, या ऋतूमध्ये केसांना घाम येणे आणि चिकट होणे सामान्य आहे. साहजिकच आंघोळ करताना केस धुवावेसे वाटतात, त्यामुळे बहुतेक लोक या ऋतूत केस पुन्हा पुन्हा धुतात, पण कंडिशनर वापरणे टाळतात. वारंवार शॅम्पू केल्याने केस आणि टाळूचे नैसर्गिक तेलही कमी होते. असे करण्याऐवजी केसांच्या कंडिशनिंगवर अधिक लक्ष केंद्रित करा. केसांना कंडिशनर किंवा मास्क लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या जेणेकरून केस मजबूत राहतील.

​पूलमध्ये घ्या विशेष काळजी
हेअर सीरम, हीट प्रोडक्ट्सचा या उन्हाळ्यात वापर करा. अनेकदा गरमीत स्विमिंग पूलला जाणे होते अशावेळी केसांची विशेष काळजी घेणे गरडेचे आहे. पूलमधील क्लोरीन पूर्णपणे कोरड्या केसांमध्ये शोषले जाते आणि केसांना नुकसान होते. केसांसाठी सनस्क्रीनही बाजारात उपलब्ध आहेत. तसेच हेअर कॅपचा वापर देखील स्विमिंग पूलमध्ये करू शकता.

​कायम केस मोकळे सोडणे
हलक्या फुलक्या ड्रेससह, टी-शर्ट किंवा अगदी साध्या साध्या ड्रेससह, खुले केस नेहमी लूकमध्ये एक स्टाइलिश प्रभाव देतात. मुलींना उन्हाळ्यात मोकळे केस ठेवायला आवडतात, पण त्यामुळे केसांमध्ये धूळ, घाण भरण्याची समस्या निर्माण होते, ज्याला तज्ञ केस आणि टाळूसाठी चांगले मानत नाहीत. त्याऐवजी पोनीटेल, फिशटेल वेणी, फ्रेंच वेणी, हाय पोनी किंवा टॉप नॉट हेअर लूकसाठी जा. केसांना सनस्क्रीन लावा आणि केसांसाठी स्कार्फ किंवा टोपी वापरा.

​केसांना नॅच्युरल राहू द्या
नॅच्युरल केस अनेकदा आनंद देतात. तुमचा लूक एनहान्स करायला फायदेशीर असतात. मात्र अनेकदा महिला केसांना कर्ली करणे किंवा थोडे वेवी करणे पसंत करतात. पण ही तुमची आवड उन्हाळ्यात घातक ठरू शकते. केसं अतिशय नैसर्गिक राहू द्या. या नैसर्गिक केसांना उन्हाळ्यात कोणत्या प्रोडक्ट्सपासून लांब ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *