अजित पवार यांची केंद्र सरकारवर टीका, म्हणाले…

चंद्रपूर महानगर पालिकेतील नगरसेवक, मुंबईमधील भाजपचे पदाधिकारी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापनदिननिमित्त 19 तारखेला दिल्ली येथे मोठा उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

राज्यात मधल्या काळात पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती. राज्य सरकारला जे काही शक्य होतं ते केलं होतं. मात्र, त्यानंतरही अनेक आरोप प्रत्यारोप सुरु होते. यंदा राज्याने कुठलाही नवीन टॅक्स न वाढवता अर्थसंकल्प सादर केला.

केंद्राने आता साधारण पेट्रोल 8 रुपये आणि डिझेलची 2 रुपयाने कपात केली. पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत आहे त्यात केंद्र टॅक्स लावतो आणि राज्य सरकार व्हॅट लावतो.कोणत्याही राज्याला विकास कामांसाठी निधी लागत असतो. त्या त्या राज्यांच्या निधीवर टॅक्स आधारित असतो. केंद्र सरकार वेगवेगळे टॅक्स लावतात त्यात एका टॅक्समध्ये आपल्याला हिस्सा मिळतो. जी रक्कम आम्ही कमी केली त्याचा राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. तरीही भाजपचे नेते बोलताय अजून कपात करायला हवी.

मी अर्थमंत्री आहे त्यामुळे राज्य सरकारला जितकी जमेल तितकी कपात आम्ही केली आहे. आमचं केंद्र सरकार सारखं नाही. आधी मोठ्या प्रमाणावर किमती वाढवायच्या आणि नंतर अर्ध्या कमी करायच्या. तसलं आम्हाला जमत नाही असा टोला यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *