“आता परबांचा नंबर; कपड्यांची बॅग तयार ठेवावी”

(political news) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Minister Anil Parab) यांच्या घरावर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. यासोबतच अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि दापोलीत एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता ईडीने केलेल्या धाडसत्रानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं, “अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू… अनिल देशमुख, नवाब मलिक त्याच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. (political news)

शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.

अनिल परबांचा अल्प परिचय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी अनिल परबांची ओळख आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल परब परिवहन मंत्री आहेत.

गेल्या 20 वर्षांपासून अनिल परब शिवसेनेत कार्यरत.

बीकॉमचं शिक्षण पूर्ण केल्यावर एलएलबीचं शिक्षण घेतलं.

अनिल परब हे अ‍ॅडवोकेट आहेत. वकिली करता-करता सामाजिक कार्यात अनिल परबांनी सहभाग नोंदवला.

सामाजिक कार्यक्रम करता-करता राजकारणात प्रवेश केला.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात अनिल परबांचा सक्रीय सहभाग.

2001 मध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली

2004 मध्ये विधानपरिषदेवर आमदारकीची संधी मिळाली.

2015 साली वांद्रे- पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला आणि त्या पराभवामागे मोठं योगदान हे अनिल परब यांचं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *