जंजिरा किल्ला पाहण्यास पर्यटकांना बंदी

प्रतिनिधी:- विजय पाटील

जंजिरा किल्ला (fort) हा अजिंक्य किल्ला मानला जातो.या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जंजिरा किल्ला हा 26/05/2022 पासून पर्यटकांना पाहण्यास जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मान्सूनच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने समुद्राच्या लाटा मध्ये बदल होऊ लागला असल्याने जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उतरणे कठीण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. कोणताही अपघात होवू नये. यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागामार्फत जंजिरा किल्ल्यावर (fort) जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *