CM ठाकरेंवर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली, असा**मुख्यमंत्री..

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीच्या कारावाईनंतर आता आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. ईडीकडून कारवाई सुरु असलेल्या दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा मंत्री परब यांनी केला आहे. दरम्यान, परब यांच्या या दाव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्री परब यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करताना सोमय्या यांची जीभ घसरली आहे. ते आज मुबंईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.सोमय्या म्हणाले, मंत्री अनिल परब (Anil Parab) दापोलीतील रिसॉर्ट माझ्या मालकीचे नसल्याचे सांगतात. दापोलीतीस ते रिसॉर्ट सदानंद कदम यांचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. रिसॉर्ट दुसऱ्याच्या मालकीचे असताना डिसेंबर २०२० मध्ये परब यांनी या जागेचा मालमत्ता कर का भरला, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. माणूस एव्हढा नाटकी बनू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं आहे. यांना नोबेल मिळालं पाहिजे. अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. १२ मुद्दे मी काढले आहेत. त्याची उत्तर अनिल परब का देत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.पुढे ते म्हणाले, अनिल परब यांनी २०२०-२१ मध्ये रिसॉर्टचा मालमत्ता कर भरला. त्याची पावती आहे. तो मी नव्हेच, नाट्यकार अनिल परबांनी यांचं उत्तर द्यावं. दुसरी पावती आहे, ती नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मधील. २०१९-२० मध्येही या रिसॉर्टचा मालमत्ता कर, दिवाबत्ती कर अनिल परब यांनी भरला आहे. हा रिसॉर्ट सदानंद परबचा आहे, तर अनिल परब घरपट्टी तुम्ही का भरत होतात?,’ असा सवाल सोमय्यांनी केला.मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली म्हणाले..

25 कोटींचा रिसॉर्ट अनिल परब यांचा आहे, उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्याचं नाटक केलं, आता परब नाटक करत आहेत, यांना नोबेल मिळालं पाहिजे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी पहिला नाही. अनिल परब आता सुटणार नाहीत, त्यांना जेलमध्ये जावं लागणार आहे. हा पैसा वाझेचा आहे की खरमाटेचा आहे हा सवाल आहे. आता यशवंत जाधव यांची सुरुवात झाली, काल प्रधान डीलर या विरोधात कंपनी मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे, त्यांच्या पूर्ण परिवार विरोधात कारवाई सुरू झाली आहे. त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचा नंबर लागणार आहे, असंही त्यांनी सूचित केलं आहे.
दरम्यान, अनिल परब यांच्यावर ईडीनं (ED) धाड टाकली असून त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला होता. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *