संपूर्ण चेह-यावरची चरबी मेणासारखी वितळेल, ‘या’ 5 साध्यासोप्या फेस एक्सरसाइज..!
पोट, कंबर, पाय, मांड्या, हात याभोवती वजन वाढणे सामान्य आहे. पण काही लोकांच्या चेहऱ्यावरही चरबी चढू शकते आणि त्याचा परिणाम चेह-याचे वजन वाढण्यात होऊ शकतो. असे बरेच लोक आहेत ज्यांच्या हनुवटी, गाल आणि जबड्यावर भरपूर चरबी साठलेली असते, ज्याला फेशियल फॅट (facial fat) म्हणतात. साहजिकच तोंडावर जमा झालेली चरबी कोणत्याही सौंदर्याला कमी करू शकते. दुर्दैवाने चेहऱ्यावरील चरबीपासून मुक्ती मिळवणे सोपे नाही. चेहऱ्याचा व्यायाम हा तुमच्या समस्येवरचा उत्तम उपाय आहे.
वजन कमी करण्यासाठी कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की वजन कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहार. तथापि, असे काही व्यायाम आहेत ज्याद्वारे तुम्ही चेहऱ्याच्या स्नायूंना बळकट करून, सुरकुत्या दूर करून आणि चेह-यावरील रक्ताभिसरण वाढवून चेहऱ्याच्या लठ्ठपणापासून मोठ्या प्रमाणात आराम मिळवू शकता.
गाल फुगवा
- स्टेप 1: दीर्घ श्वास घेत तोंडात हवा भरा आणि गाल फुग्यासारखे फुगवा.
- स्टेप 2 : 10 सेकंद हवा तोंडात रोखून ठेवा.
- स्टेप 3 : आता 10 सेकंदांसाठी हवा डावीकडील गालात आणि नंतर उजवीकडील गालात 10 सेकंदांसाठी धरून ठेवण्याचा प्रयत्न करा.
- स्टेप 4 : आता हवा बाहेर सोडा आणि आपल्या तोंडात एक मोठा “ओ” बनवा.
- स्टेप 5 : हा व्यायाम 5 वेळा पुन्हा पुन्हा करा.
आयब्रो वर करा
- स्टेप 1 : डोळे मोठे करा आणि भुवया वर करा आणि भुवयांमध्ये सुरकुत्या नाहीत याची खात्री करा.
- स्टेप 2 : तर्जनी आणि मधले बोट भुवयांच्या मध्ये एकत्र ठेवा.
- स्टेप 3 : हाताची इतर बोटे आणि तळवा चेहऱ्यावर टेकवा.
- स्टेप 4 : तर्जनी आणि मधले बोट यांच्या मदतीने भुवया वर आणि खाली करा.
- स्टेप 5 : याचे नियमितपणे 30 सेकंदांचे 3 सेट करा.
फिश फेस
- स्टेप 1: तोंड बंद करा आणि माशाच्या चेहऱ्याप्रमाणे गाल आतल्या बाजूला खेचून घ्या.
- स्टेप 2 : या पोझमध्ये राहून हसण्याचा प्रयत्न करा.
- स्टेप 3 : 15 ते 20 सेकंद या पोझमध्येच राहा. तुम्हाला गाल आणि जबड्याच्या भागात तणाव जाणवेल
- स्टेप 4 : आता पोझ सोडा आणि आराम करा.
- स्टेप 5 : ही एक्सरसाइज नियमितपणे किमान 5 वेळा करा.
चिन लिफ्ट
- स्टेप 1: पाठ सरळ ठेवून कुठेतरी बसा किंवा उभे रहा.
- स्टेप 2 : डोके मागे टेकवा, तोंड बंद ठेवा आणि शक्य तितकी मान ताणून ठेवा.
- स्टेप 3 : खालचा ओठ तुमच्या वरच्या ओठाच्यावर दाबण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की आपल्याला वर बघायचे आहे.
- स्टेप 4 : 5 सेकंद आहे त्या पोझमध्येच राहा
- स्टेप 5 : आपले डोके पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत आणा.
- स्टेप 6 : नियमितपणे 10 ते 15 सेट पूर्ण करा.