धनगर आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करणार : गोपीचंद पडळकर

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळविण्याकरिता लढा सुरूच असून, भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी नेते सदाभाऊ खोत नाशिकमध्ये आले असता, सिडकोतील रायगड चौक येथील शहरातील पहिला पूर्णाकृती पुतळा असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी सिडको येथे आले होते. त्यावेळी पडळकर बोलत होते. पडळकर व खोत यांचा सत्कार समाजाच्या वतीने धनंजय बुचुडे व छगन ढोणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नीलेश हाके, राजेंद्र शिंदे, राहुल जारकड, ज्ञानेश्वर थोरात, भाऊसाहेब ओहळ, अतुल चौधरी, प्रदीप ठाकरे, सागर विसे, शिवाजी शिंदे, वैभव ताजनपुरे, विजय नावंदर, रोहित काकडे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *