ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या आईने ‘हे’ फळ खाल्यामुळे बिघडू शकते बाळाची तब्बेत?
गरोदर राहण्याआधी, गरोदर राहिल्यानंतर अगदी नऊ महिन्याच्या गर्भारपणात आणि अगदी प्रसूतीनंतर हेल्दी डाएट घेणं अत्यंत गरजेचं असतं. पहिल्यांदाच आई झालेल्या मातेकरता स्तनपानाचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो. अशावेळी संतुलित आहार महत्वाचा मानला जातो. कारण हा आहार आई आणि बाळासाठी फायदेशीर असतो.
पोषकतत्व ते अगदी योग्य डाएट घेतल्यानंतर डिलिवरीनंतर लवकर रिकवरी होते. यामुळे बाळांची वाढ देखील चांगली होते. त्यामुळे मातेने आपल्या आहारात संतुलित आहार घेणे गरजेचे असते. मातेच्या आहाराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. असाच एक समज म्हणजे ब्रेस्टफिडिंद करणाऱ्या आईला आंबट फळ खाण्यास मज्जाव केला जातो.
नवजात शिशु आहारासाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ बाळ आहारासाठी आईवर पूर्णपणे अवलंबून असतं. आई जे काही खाते ते ब्रेस्टमिल्कच्यामार्फत बाळाच्या पोटात जाते. अशावेळी आईला काही ठराविक पदार्थ खाण्यापासून मनाई केली जाते. कारण काही पदार्थांमुळे बाळाला ऍलर्जी किंवा त्याच्या पचनसंस्थेत अडथळा निर्माण होऊ शकतो. असेच आंबट फळे म्हणजे सिट्रस पदार्थ बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. कारण बाळाची पचनसंस्था विकसित होण्यास थोडा काळावधी लागतो. कारण आईने सिट्रस फळ खाल्यानंतर बाळाला ऍसिडिटीचा त्रास होतो.
सिट्रस फळे का खाऊ नयेत?
आंबट फळांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. हे पोषक तत्व बाळाची इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. तसेच सांधे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही बाळाला दूध पाजत असाल तर याचा अर्थ असा नाही स्तनपान करणाऱ्या मातेने आंबट फळ खाऊच नये. कारण यामध्ये अधिक प्रमाणात पोषणतत्व असतात. या फळांचा ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता. मात्र अधिक प्रमाणात घेणं टाळा. कारण सिट्रस फ्रूट्स खाल्यामुळे लहान मुलांचं पोट खराब होतं. यामुळे स्तनपान करणाऱ्या मातेने काळजी घेणं गरजेचे आहे.
सिट्रस फळे का गरजेचे आहेत?
या फळांत विटॅमिन सी, फ्लेवेनॉइड्स आणि फायबर असते. हे एक आवश्यक एँटीऑक्सीडेंट आहे. ज्यामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो. ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या मातेला दिवसातून दोनवेळा तरी आंबट फळे खायला हवेत. लोहयुक्त पदार्थांसह लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने अन्नातून लोह शोषण्यास मदत होते. हे खनिज आईच्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवते.
विटॅमिन सीचा फायदा
व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते घेतल्याने गर्भाशयाला जलद बरे होण्यास मदत होते. यामुळे, आई आणि मुलाची रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करते. कारण त्यांना पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॉडीज मिळतात. प्रसूतीनंतर कोलेजन वाढवून ते स्ट्रेच मार्क्स टाळू शकतात.
एँटीऑक्सिडेंटचे गुण
लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट शरीरातील सूज कमी करण्याचे काम करतात. ते फायबर आणि पाण्यामध्ये देखील भरपूर असतात, ज्यामुळे ते आईला बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवतात आणि शरीराला हायड्रेट ठेवतात. तसेच ही फळे स्तनपान करणाऱ्या मातेच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
काय खाऊ नये
स्तनपान करणाऱ्या आईने चुकीच्या आहारापासून दूर राहावे. कारण त्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पारा, जास्त प्रमाणात टॅनिन आणि कॅफीन, मसालेदार अन्न आणि अल्कोहोल असलेल्या सीफूडपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. तसेच ज्या पदार्थाचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यार होतो तो पदार्थ उत्तमच असणे आवश्यक असतं. आहार ताजा आणि पोषकतत्वांनी भरपूर समृद्ध असणारा असावा.