नांदणी ते धरणगुत्ती रोडवर पाणी आल्याने रस्ता बंद. ग्रामपंचायत कडून कुठलीही व्यवस्था नाही
जयसिंगपूर/प्रतिनिधी;- विजय पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढता,पंचगंगा नदीची पातळी पुन्हा वाढत असल्याने दिसत आहे. पंचगंगा नदीची पातळी वाढत असल्याने जवळपासच्या लोकांना पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने धरणगुत्ती ते नांदणी या गावाला जो मिळणार रस्ता आहे, त्या रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे. तरीही लोक जीव धोक्यात घालून पाण्यातून रस्ता ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
धरणगुत्ती ग्रामपंचायत व नांदणी ग्रामपंचायत यांच्याकडून रस्ता बंदचे कोणतेही बॅरिकेट्स लावण्यात आलेले नाही.
लवकरात लवकर लक्ष घालून ग्रामपंचायत यांनी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात यावा.अशी लोकांच्याकडून मागणी होत आहे.