बरणीचं झाकण उघडत नाहीये? लगेच ‘या’ ट्रीक वापरा

 घरातली कोणतीही कामं सांगा, फक्त त्या बरण्यांची घट्ट झालेली झाकणं उघडण्याचं काम सांगू नका असं अनेकजण सांगताना दिसतात. बऱ्याचदा बरणीचं झाकण उघडत नाही, म्हणून आपण कापड हातात धरून, हात पूर्णपणे कोरडे करून, बरणी उभी, आडवी, वाकडी करुन तो उघडण्याचा प्रयत्न करतो आणि बहुतांश वेळी पदरी निराशाच पडते. (how to open the lid of Stubborn Jars read tips and tricks)

शेवटी, ती बरणी पुन्हा एकदा सज्जावर ठेवली जाते. घरातल्या या नकोशा वाटणाऱ्या कामापासून तुम्हीही दूर पळता का? यापुढे असं करु नका, कारण काही Tips आणि Tricks तुमचा हा प्रश्न सोडवणार आहेत.

– झाकणावर हलका फटका मारा 
लाडकाडाचा चमचा किंवा बचर नाईफ घ्या आणि त्यानं बरणीच्या न उघडणाऱ्या झाकणावर हलका फटका मारा. एकदोन फटके मारल्यानंतर बरणीचं झाकण आपोआल सैल होईल

– बरणी तिरपी करुन उघडण्याचा प्रयत्न करा 
एका हातानं बरणी अंदाजे 45 अंशांवर तिरपी पकडा आणि दुसऱ्या हातानं तिच्या तळाशी फटका मारा. या ट्रीकला ‘वॉटर हॅमर’ असं म्हणतात. असं केल्यास बरणीच्या झाकणाजवळ तयार झालेला दाब कमी होतो.

– झाकणाच्या भागाला ऊब द्या 
उष्णतेमुळं बरणीचं झाकण काहीसं विस्तारतं आणि त्यामुळं दाब कमी होऊन ते अगदी सहजपणे उघडतं. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये काही सेकंद बरणीच्या झाकणाचा भाग बुडवून ठेवा आणि लगेचच ते उघडण्याचा प्रयत्न करा.

बरणी या सर्व प्रयत्नांनी उघडतच नाही, असं होणार नाही. पण, तरीही तुम्ही अपयशी ठरलात तर बाजारात काही अशी उपकरणं मिळतात ज्यामुळं झाकण अगदी सहजपणे उघडता येतं. त्यामुळं तुम्ही त्यांचाही वापर करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *