हृदयाच्या आरोग्यासाठी ओव्याचा चहा फायदेशीर, पाहा कसा ते..
ओवा हा चवीने कडू आणि थोडा तिखट असतो. अनेक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी ओव्याचा वापर होतो. चवीला कडवट असल्याने तो अनेकांना आवडत नाही. मात्र ओवा हा पोटाच्या काही आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. ओव्यामुळे पोटदुखी, गॅस, उलट्या, आंबट ढेकर आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो. लहान बाळ रडत असले की त्यांच्या तोंडात ओवा फुंकला जातो. यामुळे जर त्याच्या पोटात कळ होत असेल तर ती कमी होईल अशा उद्देश असतो.ओव्यामध्ये प्रथिने, चरबी, खनिजे, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय सेलरीमध्ये कॅल्शियम, थायमिन, रिबोफ्लेविन, फॉस्फरस, लोह आणि नियासिनही चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ओव्याच्या चहाचे सेवन केल्यास शरीर बऱ्याच आरोग्याच्या समस्येंपासून दूर राहते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही ओव्याचा चहा घेऊ शकता. ओव्याच्या चहात फायबरचे प्रमाण अधिक असते. तो फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. फायबरमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
हृदय निरोगी ठेवते
ओव्याचा चहा हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपोयगी पडते. या चहामध्ये ओमेगा तीन फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. आणि हे घटक हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
पचनशक्ती मजबूत राहते
ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी ओव्याचे सेवन करावे. यामध्ये आढळणारे तेल पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे या चहाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुदढ राहते.
दम्याच्या रुग्णांना फायदेशीर
ओव्याच्या चहातून येणाऱ्या धूराचा श्वास घेतल्यास नाकातील मार्ग साफ होतात. मधाचे काही थेंब टाकून ओव्याचा चहा बनवून तो गरम करून प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्ही वाढलेल्या कोलेरेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर हा चहा घ्या. अजवाईन चहा प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते.