महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार व माहिती अधिकार तसेच पत्रकार संरक्षण समिती यांच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेकडे मागण्यांसाठी बेधडक मोर्चा
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) जयसिंगपूर या ठिकाणी दि.16/09/2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार व माहिती अधिकारी विभाग तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपरिषदे समोर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा हेतू असा होता घरकुल योजनेबाबत तसेच हक्काची घरे मिळवून देण्यासाठी अनेक सत्ताधिकार्यांनी आश्वासन दिले. परंतु निघालेल्या जिआर नुसार जयसिंगपुरातील तीस ते चाळीस वर्षापासून आणि कुटुंब राहत आहेत त्यांना घरकुल योजनेअंतर्गत कोणतेही अर्थसहाय्य झाले नाही त्यासाठी झोपडपट्टी धारकांना व वर्षानुवर्षे राहत असलेल्या भाडेकरूंना स्वतःची हक्काची पक्की घरे बांधून मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेसमोर महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खाली
लप्रमाणे आहेत.
१. जयसिंगपूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेली झोपडपट्टी चे नियमितीकरण होऊन त्यांना हक्काची पक्की घरे बांधून मिळावी.
२.अतिक्रमण विभागातील झोपडपट्टीवजा घरे घरकुल योजनेअंतर्गत पक्की बांधून मिळावीत
३. जयसिंगपूरमध्ये वर्षांनुवर्षे भाडेकरू म्हणून राहणार्या कुटुंबांना म्हाडासारख्या प्रकल्पातून स्वतःची हक्काची घरे बांधून द्यावीत.
४. लोकप्रतिनिधींना प्रलंबित ठेवून सर्वसामान्य गरजू ,निराधार ,आश्रित लोकांना अतिक्रमण विभागातील घरकुल योजनेचा प्रथमत: लाभ मिळावा.
जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी असे आश्वासन दिले आहे की जयसिंगपूर नगरपालिकेकडून जेवढी कायद्या अंतर्गत पूर्तता होईल तेवढी दिलेल्या मागण्या विचारात घेऊन मदत केली जाईल
.
वरीलप्रमाणे प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सतीश मोटे, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे रवींद्र कांबळे,राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी बंजारा प्रकोष्ठच्या श्रीकांत शिंगाई ,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पुकाळे ,पत्रकार विजय धंगेकर, राजू मुजावर ,अजय हराळे,रोहित कांबळे, राहुल घोलप, संतोष कोठावळे व घरकुल योजनेपासून वंचित महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.