जयसिंगपूर मधील महात्मा जोतिबा फुले भाजी मार्केट पडली ओस- जयसिंगपूर नगरपालिकेचे लक्ष का नाही….?
प्रतिनिधी:- विजय पाटील
जयसिंगपूर शहर हे कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील नावाजलेले शहर आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या नावे वसवलेले शहर आहे. अगदी आखीव रेखीव स्वच्छ सुदंर सेप सिटी म्हणून ओळखली जाते. याच शहरात महात्मा जोतिबा फुले भाजी मार्केट हे देखील स्वच्छ व शहराच्या मध्यवर्ती मध्ये असताना हे भाजी मार्केट (Vegetable market) सद्या ओस पडल्याचे दिसत आहे.
प्रशस्त असे सर्व सोयि युक्त भाजी मार्केट मध्ये भाजी विक्रेतेच दिसत नाही, मोजकेच भाजी पाला विक्रेते येथे असतात पण बाकीचे सर्व जण नागरी वस्ती मध्ये जेथे नागरिकांना आणि वाहनधारकांना जान्या येण्यास त्रास होतो. याठिकाणी एक चांगली शाळा देखील आहे. अश्या ठिकाणी बसतात,पण जयसिंगपूर नगरपालिका पूर्णपणे गप्प असल्याचे दिसत आहे, खरच लाखोंचा खर्च करून बांधलेली भाजी मार्केट रिकामी आहे. येथे सर्व सोयी सुविधा आहेत तर मग येथे मार्केट का भरत नाही? जर भाजी मार्केट नेहमीच दुसरीकडे भरत असेल तर इथे खर्च करून मार्केट बांधण्याची गरज च काय असा प्रश्न नागरीकातून निर्माण होत आहे.
रोज रात्री महात्मा जोतिबा फुले या मार्केट (Vegetable market) मध्ये दारू पिण्यास लोक बसतात,तेथेच झोपतात,हे मार्केट आहे की दारूचा अड्डा असा प्रश्न नागरिकांना पडत आहे, भाजी मार्केट सद्या पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामे असल्याचे दिसत आहे,
इथे लाईट आहे,संडास ची सोय आहे तरी इथे व्यापारी का बसत नाही. जर मार्केट मध्ये व्यापारी बसत नसतील तर मग हे मार्केट असच पडीक राहणार असलेलं तर हे मार्केट काढून टाकण्यात यावे असे नागरिकांच्या मधून तीव्र भावना व्यक्त केली जात आहेत.
खर तर जयसिंगपूर नगरपालिका सगळ्या बाबतीत निकामी दिसते. शहरात लोक वस्ती पेक्षा ढांसाचे साम्राज्य खूपच वाढले आहे. रस्ते तर फाटकी चाळणच झाले आहेत. याला कोन वाली आहे का❓नगरसेवक, नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांची मुदत संपली असली तरी अधिकारी सुध्दा संपले आहेत. असी उलट सुलट चर्चा जयसिंगपूर शहर व परिसरातील चौका चौकात होत आहे.