‘उद्धव गटाला मिळालेलं नाव ‘उद्धव काँग्रेस सेना’…. ठाकरेंवर कुणाचा निशाणा?

(political news) केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला दिलेलं नाव उद्धव बाळासाहेब (Balasaheb Thackeray) सेना हे नसून ते खऱ्या अर्थानं उद्धव काँग्रेस सेना आहे, असा टोला आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लगावला आहे. म्हणून येणाऱ्या काळात खरी शिवसेना बाळासाहेबांची एकनाथ शिंदेंची आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबतची शिवसेना विजयी होईल, असं वक्तव्य ही रवी राणा यांनी केलंय.

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर असे मेसेज येत असतात. त्याला गंमतीने घ्या, असं मुनगंटीवार म्हणालेत. रवी राणा यांनी केलेलं आणखी एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. रामाला विरोधा केल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह गेलं, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयानुसार, ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलंय. तर धगधगती मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. शिंदेंना कोणतं चिन्हं मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना या नावावरही उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. याविरोधात ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. (political news)

तसेच निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह गोठवण्यात घाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. याविरोधातील एक याचिकाही दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *