साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दिवाळी पाडवा; पाहा शुभ मुहूर्त
दिवाळी सण (festival) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण असतो. दिवाळीमध्ये पाडवा एक महत्तवाचा सण असतो. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी शूभ मुहूर्त म्हणून सोने-नाणे, विविध वस्तू खरेदी केल्या जातात. तसेच व्यापारी मंडळी आपल्या सर्व जमाखर्चाच्या वह्या, साहित्याची पूजा केली जाते.
एक विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेपूर्वी पाडवा सण येतो. परंतु यावर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आहे. या वर्षी बुधवार (दि.26) दिवाळी (festival) पाडवा आणि भाऊबीज आहे. तर या सणाला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते.
पाहा दिवाळी पाडवाचा आजचा शुभ मुहूर्त
दिवाळी पाडव्याची पूजा करणेसाठी वही पूजेसाठी सकाळी सूर्योदयापासून पहाटे 3:30 ते 6:30, सकाळी 6:30 ते 9:30, सकाळी 11:00 ते 12:30. असा आहे. तसेच सकाळी 11 ते दु.12:15 आणि दु.4:30 ते सायं.6 असाही शूभ मुहूर्त असेल. तसेच सायंकाळी 7:40 पासून रात्री 9:10 या वेळेत वहीपूजन करण्यासाठी मुहूर्त आहे.