चंद्रकांत पाटलांवर ऍट्रोसिटीचा गुन्हा?

राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हाय हाय म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात आंदोलन (agitation) केले आहे. पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी केली.

थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ त्यांच्याच कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन (agitation) करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी पैठणमध्ये केलं होतं.

याआधी वक्तव्याच्या निषेधार्थ पाटील यांच्या विरोधात त्यांचे फोटो विद्रूप करून पुण्यात काही ठिकाणी फ्लेक्स देखील लावण्यात आले होते. पाटील यांच्या विधानामुळे रोष वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पाटील यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सह पोलिस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *