परीक्षेत मार्क कमी पडल्याच्या भीतीने 15 वर्षीय मुलाने आत्महत्या करणार असे लिहून बेपत्ता झाल्याने जयसिंगपूर पोलिसांनी शोध मोहीम चालू करून आई-वडिलांच्या स्वाधीन केले

प्रतिनिधी:-विजय पाटील

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सचिन बलदवा रा. जयसिंगपूर यांचा मुलगा नवल बलदवा वय वर्ष १५ हा परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून नैराश्याच्या भरात आत्महत्या करणार अशी चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने जयसिंगपूर मध्ये खळबळ उडाली.

नवल बलदवा हा बेपत्ता झाल्याने यांचे वडील सचिन बलदवा रा. जयसिंगपूर यांनी त्वरित जयसिंगपूर पोलीस ठाणे येऊन सर्व हकीकत सांगितल्याने जयसिंगपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी बेपत्ता झालेल्या मुलाची शोध मोहीम त्वरित चालू केली. मुलाच्या मोबाईलचे ताबडतोब लोकेशन काढून मिळालेल्या लोकेशनवर जाऊन अमलदार पो. कॉ.1333 रोहित डावाळे व पो.हे. कॉ.1011. पटेल यांनी त्या मुलास तमदलगे येथील रेल्वे फाटक येथून ताब्यात घेऊन त्या मुलाचे मन परिवर्तन करून जयसिंगपूर पोलीस ठाण्यास आणून त्याच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्तपणे दिले. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या या कामगिरीबद्दल जयसिंगपूर मध्ये कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *