नीलम निर्मळे हिची 40 किलो वजनी गटात कुस्ती मध्ये जिल्हास्तरीय निवड

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे

(sports news) जिल्हा परिषद कोल्हापूर अध्यक्षिय चषक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत केंद्रस्तरीय विभागात दत्तवाड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून शिरोळ तालुकास्तरीय स्पर्धेत शेडशाळ येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कुमार विद्या मंदिर टाकळीवाडीची विद्यार्थिनी नीलम निर्मळे हिची 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून तिची जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

सर्वत्र तिचे कौतुक होत असून सर्व गावकरी सर्व शिक्षक यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत पुढील वाटचालीसाठी मनामध्ये जिद्द असून काहीतरी करून दाखवण्याची तिची इच्छा आहे. तिला मार्गदर्शन मुख्याध्यापक सर्व शिक्षिका, शिक्षक ,व तिचे वडील यांचे मोलाचे योगदान लाभले. (sports news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *