जयसिंगपूर : नूतन सरंपच, सदस्यांना मिळणार मतदानाचा अधिकार?
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका (election) झाल्यानंतर नव्या सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी 3 जानेवारीपर्यंत बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या सरपंच व सदस्यांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 3 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, शिरोळ तालुक्यातील सुमारे 80 ते 90 हजार शेतकरी मतदार नसले, तरी त्यांना बाजार समितीसाठी निवडणुक लढविता येणार आहे. जयसिंगपूर बाजार समितीात 18 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. शिरोळ तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींचे 661 सदस्य, 151 सेवा सोसायट्यांचे 1914 संचालक, अडते व व्यापारी प्रतिनिधी 356, तर हमाल व तोलाई 87 असे 3 हजार 27 मतदार आहेत.
बाजार समितीसाठी विकास सेवा सोसायट्यांतून 11 जागा निवडून द्यायच्या असून यात 7 सर्वसाधारण, 2 महिला, 1 भटक्या जाती व विमुक्त जाती-जमाती, 1 ओबीसी. ग्रामपंचायतींतून 4 जागा निवडून द्यायच्या असून यात 2 सर्वसाधारण, 1 अर्थिक दुर्बल, 1 अनुसूचित जाती, अडते व व्यापारी प्रतिनिधी 2 जागा, तर तोलाई व हमाल 1 अशा 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. पूर्वी 19 जागा होत्या. यातील सहकारी व्यापारी मतदार रद्द झाल्याने आता होणारी निवडणूक ही 18 जागांसाठी होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांत (election) निवडून आलेले सरपंच व सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत 3 जानेवारी रोजी होणार्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.