जयसिंगपूर शहरात 31 डिसेंबर रोजी झेले चित्रमंदिरमध्ये धिंगाणा
प्रतिनिधी:- विजय पाटील
मागील वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण उत्साही असतात. अनेक फॅमिली 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी चित्रपट (movie) पाहण्यासाठी जातात.जयसिंगपूर शहरात झेले चित्रमंदिर आहे. झेले चित्र मंदिराचे तिकिट दर मागील आठवड्यामध्ये वाढवण्यात आले आहे. स्टॉल तिकीट दर 60रू वरून 80 रू केले आहे तर बाल्कनी तिकीट दर 80रू वरून 100रू केले आहे.
31 डिसेंबर 2022 रोजी झेले चित्रमंदिर मध्ये संपूर्ण खेळ वेड हा चित्रपट चालू झाला आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी चित्रपट गृहात रात्री 9 ते 12 च्या खेळामध्ये अनेकांनी धिंगाणा घातला. अनेकांनी चित्रपटगृहामध्येच दारू पिण्यास सुरुवात केली होती तर काहीजण सिगरेट ओढत होते.
अनेकांनी तर निर्लज्जपणाचा कळस गाठला. चित्रपट गृहात चित्रपट (movie) चालू असताना अश्लिल बोलणे,शिवीगाळ करणे असे प्रकार चालू केले होते. चित्रपट गृहामध्ये अशा लोकांवर देखरेख करण्यासाठी कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. अशा या अनेक व्यक्तींच्या वागण्यामुळे 4 ते 5 फॅमिली मधूनच निघून गेल्या.
चित्रपट गृहामध्ये सुरू असलेल्या या धिंगाण्याला जबाबदार कोण….? असा प्रश्न चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी केला आहे.