जागतिक विक्रमवीर अन्वी घाटगे हिचा मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक अधिकारी यांच्याकडून सत्कार..
पत्रकार नामदेव निर्मळे
जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी घाटगे, यांच्याशी भरपूर गप्पा मारून, त्यांच्या पुढील शिखर मोहीम चे आज प्रशासकीय सोपस्कार पार पडले.मा. आर. एन. रामानुजन सर (मुख्य वन संरक्षक प्रादेशिक कोल्हापूर ), मा.जी. गुरुप्रसाद ( उपवनसंरक्षक कोल्हापूर), मा. डी. एन. शिरसाळ ( प्रशासकीय अधिकारी कोल्हापूर वनवृत्त )मा. मधुकर चांदनशिवे ( विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण कोल्हापूर ). उपस्थित होते.
कोल्हापूर कन्या जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी चेतन घाटगे करणार कर्नाटक च्या सर्वोच्च शिखर वरून राजमाता जिजाऊ ना वंदन जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी चेतन घाटगे वय -3 वर्षे (वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, दुर्गकन्या,)या कर्नाटक तील सर्वोच्च शिखर मुल्लानगिरी सर करून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणार आहेत.
सोबत अन्वी ची आई व प्रशिक्षक अनिता घाटगे, वडील पोलीस चेतन घाटगे व रोहन माने तसेच चिकमंगळूरू येथील गिर्यारोहक असणार आहेत.