मा. आमदार राजेंद्र पाटील, अर्थमंत्री ना. फडणवीस यांचेकडे आग्रहाचे पत्र पाठवणार

वार्ताहर:- नामदेव निर्मळे

जयसिंगपूर – कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे, शिरोळ तालुक्यातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ शिरोळ मतदार संघाचे आमदार मा राजेंद्र पाटील यांना भेटून, चर्चा करून निवेदन दिले. शा.पो.आ.योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या (state governmet) संयुक्त विद्यमाने चालू आहे.

केंद्र खर्चाच्या ६०: आणि राज्य सरकार ४०: रक्कम खर्च करत आहे. या खर्चात स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या मानधनाचा समावेश आहे. सध्या यांना दरमहा पंधराशे रुपये मानधन दिले जाते. यामध्ये केंद्राचा हिस्सा ६०० रु आणि राज्याचा ९०० रू आहे. दररोज सात ते आठ तास काम करून घेतले जाते.आणि पन्नास रुपये मानधन दिले जाते.

राज्य सरकारकडे (state governmet) अनेक वेळा मानधन वाढवून देणे बाबत विनंती केली आहे. केंद्र सरकारने वाढ केली पाहिजे असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यावेळी केरळ कर्नाटक हरियाणा,बंगाल तामिळनाडू सरकारांनी वाढ दिली.असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील यांनी दाखवून दिल्यानंतर , राज्य अर्थमंत्र्यांनी मंजुरी देणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. राज्य फेडरेशनच्या बैठकीत याविषयी चर्चा करून महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि खासदार यांना निवेदन देऊन, त्यांच्या मार्फत अर्थमंत्र्यांना पत्र पाठवून देण्याची विनंती करण्याचे ठरविले होते.

यास अनुसरून आज सकाळी दहा वाजता शिरोळ तालुक्यातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हा अध्यक्ष तथा राज्य फेडरेशन अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील यांनी मा आमदार राजेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. मदतनीस मानधन वाढवून किमान वेतन लागू करावे, अपघात किंवा मृत्यू झाला तर संबंधित मदतनीस किंवा त्यांचे वारसदार यांना मदत अनुदान द्यावे, स्वच्छ आरोग्यदायी धान्य पुरवठा नियमितपणे करावा, वेळेवर म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन दिले पाहिजे. भाजीपाला आणि इंधनभाराची बिले वेळेवर मिळावीत इत्यादी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या शिष्टमंडळाला मा.आमदार राजेंद्र पाटील यांनी आपले निवेदन आणि मागण्या मान्य करण्यासाठी आग्रहाचे‌ पत्र मा.ना.फडणवीस यांचेकडे तात्काळ पाठवून,त्याचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

या शिष्टमंडळात प्राचार्य ए.बी.पाटील अध्यक्ष, या निवेदिता वासमकर जनरल सेक्रेटरी, या सुनीता मलिकवाडे जिल्हा कमिटी सदस्य, मा आण्णासाहेब मलिकवाडे, या गौरी पवार यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *