सावधान! चहासोबत सिगारेट पिण्याची सवय आहे? आताच बदला नाहीतर…

आपल्यापैकी अनेकजण चहाप्रेमी आहेत. अनेकांना चहा आवडतो पण काही सिगारेटचं व्यसन असणाऱ्या लोकांना चहासोबत सिगारेट घ्यायला आवडतं. अनेकजण आवडीने एका हातात चहा आणि हाताने सिगारेट ओढतात. पण तुम्हाला माहिती आहे का चहासोबत सिगारेट घेणे किती धोकादायक आहे. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.सिगारेटचं सेवन आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे सिगारेट डॉक्टर असो की इतर कोणीही सिगारेट न पिण्याचा सल्ला देतात. पण सिगारेटचं व्यसन असणारे लोक दिवसातून कित्येकदा सिगारेट ओढतात.

तुम्ही अनेकदा पाहलं असेल की चहा टपरीवर अनेक लोक चहासोबत आवडीने सिगारेट ओढतात. पण त्यांना या गोष्टीची जाणीवसुद्धा नसेल की चहासोबत सिगारेटचं सेवन किती धोकादायक ठरू शकतं.
चहासोबत सिगारेट ओढल्याने काय होतं?

चहासोबत सिगारेट ओढल्याने कँसरचा (Cancer) धोका वाढतो. जसे की सिगारेटमध्ये अनेक प्रकारचे टॉक्सिन असतात तसंच चहासोबतही अनेक प्रकारचे टॉक्सिन असतात जे आरोग्यासाठी चांगले नसतात. अशात जर तुम्ही चहा आणि सिगारेटचं एकत्र सेवन करत असाल तर कॅंसरचा धोका वाढू शकतो.
सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम

सिगारेटचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सिगारेट कधीच पिऊ नये कारण सिगारेट पिल्याने लंग्स आणि किडनी खराब होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे किडनीचे आजार किंवा कॅंसरसारखे आजारही होऊ शकतात. सिगारेटच्या सेवनामुळे इम्यूनिटीही कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *