‘वंदे भारत’मध्ये तांबड्या-पांढऱ्यासह महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखता येणार
मेल-एक्सप्रेसमध्ये देणात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी- ज्वारी – नाचणी या भरड धान्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात सीएसएमटी ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमधून होणार आहे. या दोन गाड्यांमध्ये प्रवाशांना महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखता येणार आहे. याशिवाय महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने महिलांना रोजगाराची नवी संधी निर्माण होईल.
सीएसएमटी शिर्डी, सोलापूर या दोन्ही गाड्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आहेत. त्यामुळे या गाड्यांना प्रवाशांची (Passengers) मोठी पसंती मिळणार आहे. तसेच मुंबई ते शिर्डी हा प्रवास एका दिवसात शक्य असल्याने परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे.
या दोन्ही गाड्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये साबुदाणा -शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी, बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पदार्थ आहेत. जेवणासाठी शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय प्रवाशांसमोर ठेवण्यात येणार आहेत. यासह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना नाश्त्यामध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबीर वडी, भरड धान्यांचे थालीपीठ, साबुदाणा वडा ठेवण्यात आला आहे. मांसाहारी खवय्यांसाठी सावजी चिकन, कोल्हापुरी तांबडा रस्सा देण्यात येणार आहे.
स्थानिक महिला
बचत गटांना प्राधान्य देशी, परदेशी पर्यटकांसह प्रवाशांना (Passengers) स्थानिक प्रदार्थांची चव चाखता यावी याकरिता स्थानिक महिला बचत गटांनी बनविलेल्या पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डी, सोलापूर, पुणे येथील महिला बचत गटांना उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे.
भारत एक्सप्रेस
देशातील ९ वी वंदे भारत
आर्थिक राजधानीला कापड आणि हतात्मा शहराशी जोडणार
सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर, पुण्याच्या आळंदी तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी
६ तास ३० मिनिटांत प्रवास, परिणामी सध्याच्या प्रवासात दीड तासांची बचत
वेळापत्रक (आठवड्यातले सहा दिवस)
सीएसएमटी स्थानकातून दुपारी ४.०५ वाजता सुटून सोलापूरला रात्री १०.४० वाजता पोहोचणार
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस
देशातील १० वी वंदे भारत
आर्थिक राजधानीला नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीशी जोडणार
वेळापत्रक (आठवड्यातले सहा दिवस)
सीएसएमटी स्थानकातून सकाळी ६.२० वाजता सुटून शिर्डीला सकाळी ११.४० वाजता पोहोचणार.