जयसिंगपूर पोलीस पथकाने महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा लावला 2 दिवसात शोध

प्रतिनिधी :-विजय पाटील

(local news) रवींद्र गाडीवडर हा फिर्यादी असून फिर्यादी यांच्या आई असुन गेले 10 वर्षापासुन मनोरुग्ण असुन ती मालु हायस्कुल शेजारी असले महात्मा जोतीबा फुले भाजीपाला मार्केट जयसिंगपूर मध्ये हमालीचे काम करुनती गेले 6 महीन्यापासुन मालु हायस्कुल समोर फुटपाथवर पानपट्टी ढकलगाड्याजवळ झोपत होती. वरील तारखेस वेळी व ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुनजिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी हिचे डोकीत पेवींग ब्लॉक व दगड मारुन गंभीर जखमी केले बाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

सी सी टि व्ही फुटेज मिळत नसल्यामुळे अज्ञात आरोपीचा शोध घेताना अडचणी येत होत्या. तसेच गुन्हा घडले नंतर दिवासा व रात्रीच्या वेळी फिरणारे, दारुचे व्यसनी अशा एकुण 40 ते 50 लोकांचे कडे चौकशी करुन त्यांचे कडुन माहीती घेतली. त्यानंतर अज्ञात आरोपीचा शोध सुरु असताना गोपणीय बातमीदारांकडुन माहीती मिळाली, गुन्ह्यातील जखमी महीला ही मनोरुग्ण असुन सुध्दा ती मार्केट मध्ये काम करायची, तसेच येणा जाणाऱ्या लोकांचे कडुन पैसे मागुन घ्यायची व जमलेले सर्व स्वत:जवळ ठेवायची. रविवारी तिच्या जवळ असलेले पैसे ती मोजत असताना, यातील आरोपी हसन अमरशरीफ जमादार, वय 20 वर्ष, रा. गल्ली नं. 13, रणविर चौक, जयसिंगपूर, ता. शिरोळ यांने पाहीले होते.आरोपी हा दारुचा व्यसनी असुन कोणताही कामधंदा करत नाही. तसेच आरोपी हा जखमी महीलेच्या घराजवळ राहणारा असुन महीला त्याला ओळखत होती.

त्यांनेच दारुच्या पैशासाठी जखमी महीलेवर पाळत ठेवुन तिला मारहाण करुन तिच्या जवळील पैसे काढुन घेतले असावेत अशी बातमी मिळाल्याने त्यास ताबेत घेवुन त्याला विश्वासात घेवुन त्याचे कडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांने दारुच्या पैशासाठी सदर महीलेवर पाळत ठेवुन ती मालु हायस्कुल गेट समोर फुटपाथवर झोपली असताना तिच्या जवळील पैसे काढुन घेत असताना ती जागी व ती आरडा ओरडा केल्याने तिला जिवे ठार मारण्याच्या हेतूने तिथेच पडलेल्या दगडाने व पेवींग ब्लॉक ने तिच्या डोकीत मारुन तिला गंभीर जखमी केल्या बाबत कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली आहे. (local news)

सदरचा गुन्हा घडल्यापासुन जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील स्टाफ तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील सो,मा. उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे साो, यांचे मार्गदर्शनाखाली ,मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पोलीस अंमलदार निलेश मांजरे, अभिजीत भातमारे, संदेश शेटे, अमोल अवघडे, रोहीत डावाळे, वैभव सूर्यवंशी, जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी 2 दिवसात शोधल्यामुळे जयसिंगपूर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *