अकिवाट येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या कुस्तीमध्ये सैनिक टाकळी चे सुपुत्र प्रथम क्रमांकाचे मानकरी

पत्रकार नामदेव निर्मळे

(sports news) अकिवाट तालुका शिरोळ येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सैनिक टाकळी गावचे सुपुत्र पैलवान सुबोध पाटील याने अकिवाट येथे कुस्ती स्पर्धेत श्री गुरुदत्त शुगर्स च्या 1,11,111 /-रू. “गुरुदत्त” केसरी चा घिस्सा डावात प्रतिस्पर्ध्याला चितपट करुन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

नेहमी सामाजिक बांधिलकी श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी जपत कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवले होते. प्रथम क्रमांक मानकरी ठरण्यासाठी प्रतिस्पर्धी पैलवान सुद्धा कसोटीने जिद्दीने प्रयत्न करत होते. यात पैलवान सुबोध पाटील यांना यश आले व ते श्री गुरुदत्त केसरीचे मानकरी ठरले. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. (sports news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *