उन्हाळ्यात स्किन टॅन होतेच, घरच्या घरी ‘हे’ उपाय!

आता उन्हाळा आलाय. खूप ऊन आहे म्हणून आपण बाहेर फिरणं, काम करायला जाणं अर्थातच सोडणार नाही. फिरायचं म्हटलं तर ऊन लागणारच, ऊन लागलं तर माणूस काळा पडणारच. हा जो काळेपणा असतो त्याला एक विशेष नाव आहे, “टॅन”! टॅन होणं वेगळं असतं हे आपल्याला उन्हामुळे होतं. जरा उन्हात गेलं की आपला खरा रंग जरा काळवंडतो ज्याला आपण टॅन म्हणतो. सूर्याची किरणे डायरेक्ट त्वचेवर पडली तर आपल्याला जरा जरा त्वचा काळी वाटायला लागते. घाबरून जाऊ नका, हा काळेपणा, टॅन सहज दूर करता येतो. याला फक्त सातत्य असण्याची गरज आहे. सतत आपण जर एखादं रुटीन फॉलो केलं तर ही समस्या दूर होऊ शकते. अनेकदा यासाठी महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो, पण फायदा मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही त्वचेच्या (skin) टॅनिंगपासून मुक्त होऊ शकता.

त्वचेच्या टॅनिंगपासून सुटका कशी मिळवावी

बेसन
बेसनच्या माध्यमातून त्वचेच्या टॅनिंगलाही आराम मिळू शकतो. यासाठी बेसन, हळद, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर आणि त्वचेवर लावा. आता ते सुमारे 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. शेवटी कोमट पाण्याने त्वचा धुवून घ्या.

मध
मध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे बहुतांश ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये याचा वापर केला जातो. एका बाऊलमध्ये मध आणि दही मिक्स करा आणि सुमारे 20 मिनिटे त्वचेवर (skin) ठेवा. शेवटी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा

टोमॅटो
टोमॅटो ही एक अशी फळभाजी आहे ज्याच्या वापराने कुठल्याही भाजीची चव वाढते, पण तुम्हाला माहित आहे का की याच्या मदतीने स्किन टॅनिंगपासून आराम मिळतो. यासाठी टोमॅटो बारीक करून ही पेस्ट चेहऱ्यावर आणि शरीराच्या प्रभावित भागावर १५ मिनिटे लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. आठवडाभर या रुटीनचे पालन केल्यास इच्छित परिणाम मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *