उन्हाळ्यात कांदा खाण्याचे ‘हे’ फायदे जाणून व्हाल हैराण
अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा (onion) खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चा कांदे हे आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उकाड्याने हैराण असणाऱ्यांनी कच्चा कांदा खाण्यास आजपासून सुरुवात करा. त्यामुळे उन्हाच्या दिवसात तुम्हाला याचे खूप सारे फायदे मिळतील. सध्या उन्हाळा सुरु आहे. अशा स्थितीत शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन केले पाहिजे. कच्चा कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक असे घटक मिळतात.
यंदा उन्हाळा लवकरच सुरु झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत तुम्ही स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. मुंबईसह काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईचे तापमान दोन दिवसापूर्वी 37 अंशावर पोहोचले होते. तसेच उन्हतेचा कहर वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक लस्सी, शिकंजी इत्यादी पदार्थांचे सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का, कांद्यामुळे तुम्हाला या कडक उन्हापासून आराम मिळू शकतो. होय, उन्हाळ्यात कांदा खाणे आवश्यक आहे.
हे आहेत कांदा खाण्याचे फायदे
– उन्हाळ्यात कांदा (onion) खाण्याचे फायदा म्हणजे उष्माघातापासून बचाव होतो. कांदा तुम्हाला उष्माघात टाळण्यास मदत करु शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. उष्माघात टाळण्यासाठी कांद्याचे सेवन केले जाऊ शकते.
– कच्चा कांदा खाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत आणि उष्णतेचा प्रकोपही सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कांद्यामध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. त्याचबरोबर ते शरीराला आतून थंड ठेवतात.
– कच्चा कांदा खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. उन्हाळ्यात बहुतेकांना पचनाच्या समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत कच्च्या कांद्याचे सेवन करावे, त्यामुळे पचन समस्या सुटण्यास मदत होते. याचे सेवन करताना त्यात लिंबाचा रसही टाकता येतो. असे केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते तसेच आराम मिळतो.