आता पांढऱ्या केसांपासून कायमची सुटका? अखेर उपाय मिळाला!

तुम्ही पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात का? केस सतत पांढरे होत असल्यामुळे तुम्ही कंटाळले आहात का? तर मग आता चिंता सोडा. कारण पांढऱ्या केसांपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठीच्या प्रयोगात शास्त्रज्ञांना कमालीचं यश मिळालंय. केस कायमस्वरुपी काळे करण्यासंबंधी न्यूयॉर्क विद्यापीठात (New York University) संशोधन (research) झालं. त्यामुळे आता तरुण वयात केसं पांढरी झालीत, अशा युवकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

मानवी केसांच्या फॉलिकल्समधील मेलानोसाईट स्टेम सेल्समुळे (melanocyte stem cells) केस काळे राहतात. वाढत्या वयानुसार मेलानोसाईट स्टेम सेल्स काम करणं बंद करतात. मेलानोसाईट स्टेम सेल्सने काम करणं बंद केलं तर केस पांढरे होतात. उंदरांच्या मेलानोसाईट स्टेम सेल्सवर संशोधन (research) करण्यात आलं. फॉलिकल्समधील मेलानोसाईट स्टेम सेल्सचं पुनरुज्जीवन करण्यात आलं.

उंदरांच्या म्हाताऱ्या झालेल्या मेलानोसाईट स्टेम सेल्स प्रयोगानंतर (Research) पुन्हा तरुण झाल्या. हाच प्रयोग मानवी शरिरात यशस्वी झाला तर केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मेलानोसाईट सेल्स कधीच म्हाताऱ्या होणार नाहीत. त्यामुळे मनुष्याला पांढऱ्या केसांपासून कायमची मुक्ती मिळेल. अर्थात हा प्रयोग आता केवळ उंदरांवर यशस्वी झालाय. मानवी शरीरावर याच्या चाचण्याही सुरु झालेल्या नाहीत. मात्र नजीकच्या काही वर्षात या चाचण्या सुरु होऊन प्रयोग यशस्वी होऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय.

दरम्यान, चुकीची जीवनशैली, हार्मोनल बदल, केसांसाठी चुकीच्या उत्पादनांचा वापर इत्यादी गोष्टीही केस पांढरे होण्याचे कारण बनतात. अशा परिस्थितीत घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकरित्या केस पुन्हा काळे करू शकता. आवळा, काळे तीळ,भाज्या आणि फळं आहार असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे केस पांढरे होणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *