वजन कमी करायचं आहे? तर ‘या’ 4 फळांचा आजच करा समावेश

आपण फीट असणं हे संपूर्णपणे आपल्या लाइफस्टाइलवर आधारीत असतं. जर तुम्ही जो आहार (diet) घेत असाल तो चांगला नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याचवेळा लोक ही लठ्ठपणाचा सामना करतात. त्यात जर तुम्ही लठ्ठपणाचे कधी शिकार झालात तर त्यावेळी वजन कमी करणं खूप कठीण होतं. त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डायटवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे. तर अशा वेळी तुम्ही कोणत्या फळांचा तुमच्या आहारात समावेश केला की तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल हे जाणून घेऊया…

संत्री

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही संत्रीचा तुमच्या रोजच्या आहारात (diet) समावेश करा. संत्रीत कॅलरिज खूप कमी असतात आणि व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यासोबत संत्रीमध्ये फायबरही मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास तुम्हाला मदत करू शकते. त्यामुळे रोजच्या आहारात नक्कीच संत्रीचा समावेश करा.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे फळ चवीला जितकं टेस्टी असतं तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी तुमची मदत करू शकते. जर तुम्हाला खूप लवकर भूक लागत असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊ शकता. स्ट्रॉबेरी खाल्यानं तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. जर तुम्ही स्ट्रॉबेरी खूप भागल्यानंतर खाल्ली तर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासही मदत होईल.

सफरचंद

वजन कमी होण्यासाठी सगळ्यात जास्त चांगल कोणत फळ असेल तर त्यात सफरचंद हे देखील महत्त्वाचं आहे. सफरचंद रोज खाल्यानं फक्त आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहणार नाही तर त्यासोबतच आपलं वजन कमी होण्यासही मदत होते. त्याच कारण म्हणजे सफरचंदमध्ये सगळ्यात जास्त फायबरचे प्रमाण असते. ज्या फळात फायबर मोठ्या प्रमाणात असते ते खाल्यानं वजन कमी होती. त्यामुळे जर तुम्हाला फक्त तुमचं हृदयाचे आरोग्य चांगले ठेलायचं नाही तर वजनही कमी करायचं असेल तर सफरचंदाचे सेवन नक्कीच करा.

बेरीज

बेरीज हे असे फळ आहे जे वजन कमी करण्यासाठी अनेकदा जीम ट्रेनर पासून, न्युट्रिशिअनिस्ट ते डायटिशनपर्यंत अनेक लोक सजेस्ट करताना दिसतात. बेरीजमध्ये कॅलरीजचे प्रमाण हे नसल्यासारखे असते. त्यामुळे बेरीजचा ज्यूस किंवा मग त्याचं सॅलेड किंवा ओट्समध्ये कशातही खाऊ शकता. असे जर तुम्ही रोज केले तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *