संत्रीची खीर या गंभीर आजारावर करते मात, उन्हाळ्यात तर सर्वात बेस्ट!
संत्री (Oranges) हे फळ भरपूर लोकांचं आवडतं फळ असेल. अनेक लोक संत्री खातातच पण सोबतच त्याचा ज्यूस सुद्धा आवडीने पितात. पण तुम्ही कधी या गोड संत्रीची खीर खाल्ली आहे का? संत्रीची खीर ऐकून तुम्ही नक्कीच चकीत झाला असाल. पण होय या संत्रीची खीर टेस्टी असतेच सोबतच ती खीर खाल्ल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. तर आज आपण ही खीर कशी बनवायची याबाबत आणि त्यापासून शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.
संत्रीपासून खीर बनवण्यासाठी आवश्यक सामग्री
1/2 किलो संत्री 1 लीटर दूध 100 ग्राम मिल्कमेड 100 ग्राम मावा 1 चुटकी केसर 2 चमचे ड्रायफ्रूट्स 1/2 चमचा वेलची पावडर चवीनुसार साखर
संत्रीपासून खीर कशी बनवायची?
संत्रीची (Oranges) खीर बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यात दूध टाकून ते आटेपर्यंत गरम करा. त्यानंतर एका भांड्यात संत्री सोलून त्याचा गर एका भांड्यात काढा. नंतर दुध आटल्यावर त्यात दुधाचा मावा मिक्स करा आणि दोन मिनिटे ते उकळत ठेवा. मग त्यात चवीनुसार साखर, अर्धा चमचा वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि केशरची पुड टाका. हे सर्व मिक्स करून गॅस बंद करा आणि ते मिश्रण थोडावेळ थंड व्हायला ठेवा. त्यानंतर त्यात संत्र्याचा जो गर आहे तो मिक्स करा. मग हे सर्व मिश्रण 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. आता तुमची स्वादिष्ट, गोड संत्र्याची खीर तयार आहे.
संत्रीची खीर खाल्ल्याने होणारे फायदे
संत्रीची खीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसंच संत्र्यात विटॅमिन सी सारखे गुणधर्म असतात जे शरीराला आरोग्यदायी असतात. त्याचबरोबर ही खीर खाल्ल्याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.