जयसिंगपूर येथील राज सायन्स ॲकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा
(local news) जयसिंगपूर येथील राज सायन्स ॲकॅडमीचा अनमोल सुरेश पाटील याने मार्च २०२३ मध्ये झालेल्या इ. १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये ९२.५० टक्के गुण संपादन करून विज्ञान विभागात तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. ऋतुजा विजय कदम हिने ८९.३३ टक्के तर प्रणव पोपट पाटील याने ८८.८३ टक्के गुण मिळवून ॲकॅडमीमध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
ॲकॅडमीतील १० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश मिळविले. अनमोल सुरेश पाटील याने इंग्रजी विषयात १०० पैकी ९२ , फिजिक्स विषयात १०० पैकी ९१ गुण मिळविले. ऋतुजा विजय कदम हिने केमिस्ट्री विषयात १०० पैकी ९५ गुण मिळविले. प्रणव पोपट पाटील याने इंग्रजी विषयात ९१ गुण मिळविले.
माफक फी, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग या त्रिसुत्रीच्या महत्वपूर्ण योगदानामुळे गेल्या २० वर्षांपासून
ॲकॅडमी यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहे.
ॲकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा…
नेहमीप्रमाणे याही वर्षी राज सायन्स ॲकॅडमी दैदिप्यमान निकालाची उज्वल परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. गेल्याच वर्षी इ.१० वी बोर्ड परीक्षेमध्ये वेदांत झेंडे याने १०० टक्के गुण संपादन करून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवून ॲकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला व ऐतिहासिक जयसिंगपूर नगरीचे नाव अधोरेखित करीत एक नवा इतिहास घडविला होता. याही वर्षी अनमोल सुरेश पाटील व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी ॲकॅडमीच्या यशाची परंपरा कायम ठेवली. (local news)
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना ॲकॅडमीचे संचालक श्री. अनिल रजपूत, सौ. गौरांगी बनसोडे, श्री.सचिन साजने, श्री. शिवराज सूर्यवंशी व. श्री. जिनपाल मालगांवकर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ॲकॅडमीच्यावतीने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.गजानन वंटे,श्री.कुंदन पाटील,श्री.शैलेश मगदूम,श्री.नितीन परीट,श्री. बाळासाहेब खोत आदी शिक्षकवृंद उपस्थित होते..