ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? का खावं हे फळ?

रोज एक सफरचंद (apple) खाल्ल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही असे आपण अनेकदा सर्वांना म्हणताना ऐकले आहे, म्हणूनच बहुतेक आहारतज्ञ या फळाचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात आणि म्हणतात की सकाळी नाश्त्यामध्ये खा. साधारणपणे भारतातील लोक नाश्त्यात तेलकट आणि अनहेल्दी पदार्थ खातात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. सकाळी सफरचंद खाणे का फायदेशीर याबद्दल भारतातील अनेक आहारतज्ञ वेळोवेळी सांगत असतात.

ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खाण्याचे फायदे

सफरचंदाच्या सालीमध्ये फिनोलिक संयुगे आढळतात, ज्यामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही आणि आपला हृदय रोगापासून बचाव होतो.

बरेच संशोधन असं सांगतात कि, सफरचंद (apple) खाल्ल्याने आपल्याला स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. ते थांबेल असे म्हणता येत नसले तरी धोका नक्कीच कमी होईल.

जर तुम्ही सकाळी वर्कआऊट करत असाल तर ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये एक सफरचंद नक्कीच असावं. कारण व्यायामाआधी सफरचंद खाल्ल्यास तुमचा स्टॅमिना वाढण्यास आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

वजन कमी होणे ही एक मोठी समस्या आहे, किंवा लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे असे म्हणा. जर तुम्हाला वजन कायम ठेवायचे असेल तर ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खा, कारण या फळात नगण्य चरबी असते आणि फायबरची उपस्थिती वजन कमी करण्यास मदत करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *