मसाल्याच्या डब्यातील ‘हा’ पदार्थ कायमचा घालवू शकतो डोक्यातील कोंडा, जाणून घ्या!
दालचिनी (Cinnamon) हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे जो पदार्थांमधील चव वाढवण्याचं काम करतो. तसंच दालचिनीमध्ये असे अनेक घटक आहेत जे अनेक आरोग्यदायी फायदे देतात. यामध्ये प्रोटीन, विटामिन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम यासारखे अनेक गुण असतात जे की आपल्या शरीराला आरोग्यदायी असतात. तर दालचिनीमध्ये असे काही गुण आहेत जे केसांसाठी खूप उपयुक्त असतात. दालचिनी केसांच्या अनेक समस्या दूर करते. तर आपण दालचिनीच्या अशा एका मास्कबाबत जाणून घेणार आहोत जो लावल्यामुळे केसातील कोंडा दूर होतो आणि केस मऊ आणि दाट होतात.
दालचिनीपासून हेअर मास्क बनवण्यासाठी आवश्यक सामग्री
एक चमचा दालचिनी अर्धा चमचा हळदी दोन ते तीन चमचे दही
दालचिनी हेअर मास्क कसा बनवायचा?
हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी एक बाऊल घ्या. या बाऊलमध्ये एक चमचा दालचिनी (Cinnamon) आणि अर्धा चमचा हळदी टाका. त्यानंतर यामध्ये दही मिक्स करा आणि हे सर्व मिश्रण नीट मिक्स करा. तर अशाप्रकारे तुमचा हेअर मास्क तयार आहे.
दालचिनी हेअर मास्क कसा लावायचा?
दालचिनी हेअर मास्क हा केसांच्या मुळाला लावा. त्यानंतर दोन ते तीन मिनीटे केसांमध्ये हलका मसाज करा. त्यानंतर हा मास्क तुमच्या पूर्ण केसांना लावा आणि ते 15 ते 20 मिनिटे तसंच ठेवा. त्यानंतर तुमचे केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळेल आणि केसातील कोंडा दूर होईल.