गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी खा ‘हे’ खास पदार्थ
असे खूप लोक आहेत, ज्यांची हाडे दुखतात. आखडल्यासारखं वाटतं. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकांना हात, पाठीचा कणा, गुडघे आणि पाय यांच्या सांधेदुखीचा सामना करावा लागतो. जरादेखील हालचाल झाली तर ही वेदना आणखी वाढू शकते. (Relief From Knee Pain) सांध्याभोवती कोणतीही जखम, संधिवात किंवा कोणत्याही जुनाट आजारामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवलेली असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देखील सांधे खूप दुखत असतील आणि त्यामुळे तुमचे चालणे खूप कठीण होते. पण, गुडघेदुखीपासून तुम्हाला अतुम्हाला थोडा आराम (Relief) मिळू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणात या पुढील पदार्थांचा समावेश करावा लागेल.
नट्स खा
बदाम, शेंगदाणे आणि अक्रोड हे आरोग्यासाठी उत्तम आहे. सोबतच सूर्यफुलाच्या बिया आणि जवस बी देखील तुम्ही खाऊ शकता. भोपळ्याच्या बिया (हिरव्या) देखील खा. या बिया ओमेगा ३ फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध असतात. बिया, काजू, शेंगदाणेमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई देखील असते. जे सांध्यासाठी निरोगी आणि हृदयासाठी चांगले आहे.
हिरव्या भाज्या –
ब्रोकोली, फ्लॉवर खा. संधिवातामुळे होणारी जळजळ कमी करण्यास भाजीपाला मदत करते. नेहमी हिरव्या ताज्या आणि हंगामी भाज्यांचे सेवन करा.
बेरी –
ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी अशा बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. बेरीच्या सेवनाने सांधेदुखीमध्ये आराम (Relief) मिळतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. बेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्स आणि जळजळ होण्यापासून वाचवतात.
ऑलिव्ह ऑईल –
ऑलिव्ह ऑईल हे सांध्यांसाठीही ते खूप फायदेशीर मानले जाते. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑईलचा नक्कीच समावेश करा.
डार्क चॉकलेट-
डार्क चॉकलेट हे हृदयासाठी उत्तम मानले जाते. चॉकलेटमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. डार्क चॉकलेटमध्ये शरीराला जळजळ होण्याच्या हानिकारक प्रभावापासून वाचवण्यास मदत करतात.
शिवाय हळद भाजून सकाळी गरम पाण्याबरोबर घ्यावी. हाडेदुखीपासून नक्कीच आराम मिळेल. सोबत लाल शिमला मिरची, हळद, लसूण, आले, पालक, सॅल्मन फिश, ओट्स आणि द्राक्षे यांचेही सेवन करू शकता.