दररोज करा ही 3 योगासने, तुमच्या त्वचेवर येईल नॅचरल ग्लो!
सध्याचं वाढतं प्रदूषण, दररोजचं धावपळीचं जीवन, स्ट्रेस अशा अनेक गोष्टींमुळे आपली स्किन (skin) डल आणि लूझ होते. आता अगदी कमी वयातही बहुतेक महिलांची स्किन ही लूझ होताना दिसते. यामुळे स्त्रिया त्यांची स्किन फ्रेश आणि ग्लोविंग दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. पण बहुतेक महिलांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण काही योगाच्या प्रकारांबाबत जाणून घेणार आहोत जे आपली स्किन ग्लोविंग करतात आणि स्किन संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
योगगुरू बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर टवटवीत त्वचा आणि शारीरिक सौंदर्य टिकवायचे असेत तर यासाठी काही योगासने खूप प्रभावी ठरतात. तसंच जर स्त्रियांना त्यांचं तारुण्य आणि सौंदर्य कायमस्वरूपी टिकवायचे असेल तर त्यांनी जास्तीत जास्त आसने करायला हवीत.
स्त्रियांना त्यांची त्वचा (skin) तरुण आणि सुंदर दिसावी असं वाटत असते, तर त्यांनी दररोज सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार केल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर लवचिक होते. तसंच सूर्यनमस्कार केल्यामुळे रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण वाढते. त्याचबरोबर चेहरा आणि केसांना पुरेसे पोषण मिळते.
जर त्वचा टवटवीत ठेवायची असेल तर स्त्रियांनी कपालभाती प्राणायाम करायला हवा. हा प्राणायाम केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीरातील रक्त शुद्ध होते. तसंच हा प्राणायाम केल्यामुळे आपली त्वचा तरूण आणि सुंदर दिसते.
स्त्रियांनी दररोज भस्त्रिका प्राणायाम केला तर त्यांच्या त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. हा प्राणायाम केल्यामुळे रक्तात साचलेली विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर पडतात. तसंच हा प्राणायाम टवटवीत, चमकदार त्वचेसाठी सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळेच भस्त्रिका प्राणायाम न चुकता दररोज करा, मन बघा तुमची त्वचा सुंदर आणि फ्रेश दिसेल.