दि. २० जुलैचा मुंबई येथील गायरान धारकांचा राज्यव्यापी महामोर्चा यशस्वी करा : वंचितचे कोल्हापूर जिल्हा उत्तरचे अध्यक्ष प्रा. विलास कांबळे यांचे आवाहन

जयसिंगपूर / प्रतिनिधी:

वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. २० जुलै २०१३ रोजी पावसाळी अधिवेशनावर मुंबई येथे गायरान धारकांचा राज्यव्यापी महामोर्चा (Grand March) आयोजित करण्यात आला आहे. हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावनिहाय गायरान व अतिक्रमण धारक लोकांची यादी संकलित करून नाव नोंदणी करून घ्यावी तसेच गायरान व अतिक्रमण धारकांनीही या महामोर्चात मोठ्या संख्येने सामील होऊन आपला हक्क मिळवावा, असे आवाहन वंचितचे कोल्हापूर जिल्हा उत्तरचे अध्यक्ष प्रा. विलास कांबळे यांनी केले.

जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील सनसिटी हॉटेलमध्ये आयोजित जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रा. कांबळे म्हणाले, वंचित आघाडी ही नेहमीच सर्वसामान्य जनता आणि कष्टकरी, वंचित लोकांच्या पाठीशी ठामपणे राहिली आहे. गायरान व अतिक्रमण धारकांना शासनाने नोटीस पाठवून त्यांना जागा सोडण्याचे निर्देश दिल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांच्या राहण्याचा प्रश्नही तयार झाला आहे. त्यामुळे गायरान व अतिक्रमण धारकांच्या राज्यव्यापी प्रश्नाला वंचितने प्राधान्य देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी ही माहिती संकलित करावी तसेच नाव नोंदणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. याचबरोबर गायरान व अतिक्रमण धारकांनीही सहकार्य करून आपल्या हक्कासाठी या महामोर्चात (Grand March) सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. तसेच परळी येथे पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम युवकाचा झालेला मृत्यू, खुलताबाद येथे प्रशिक्षण शिबिरामध्ये झालेल्या पक्षीय धोरणांची माहिती जिल्हाध्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी जिल्हा महासचिव महादेव कुंभार, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय सुतार, सचिव विश्वास फरांडे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे, जिल्हा उपाध्यक्ष महेश महाडिक, जिल्हा सहसचिव शितल माने, जिल्हा सहसचिव संतोष राजमाने, जिल्हा सह कोषाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा संघटक पृथ्वीराज कडोलकर, कैलास काळे, आदम मुजावर, इकबाल इनामदार, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

🙏🙏
मा.संजय सुतार
प्रसिध्दी प्रमुख.
वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर उत्तर जिल्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *