स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींबाबत कोर्टानं घेतला मोठा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह २१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गिरगाव न्यायालयाने (Girgaon Court) सोमवारी (ता.२६) निर्दोष (innocent) मुक्तता केली.

७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचा निषेध करून आंदोलन केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनावर तूर, कांदा,कापूस व दूध या पिकांना हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी या आंदोलनामध्ये विधानभवनावरती तूर, दूध,कांदा व कापूस फेकून सरकारचा निषेध करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.

काल गिरगाव कोर्टात या गुन्ह्यातून सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. सहा वर्षानंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून राजू शेट्टी यांच्यासह सतीश भैय्या काकडे, प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, रवी मोरे, हंसराज बडगुले, प्रकाश बालवडकर, अमर कदम,जे.पी. परदेशी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांची निर्दोष (innocent) मुक्तता केली. या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज अॅड. संदीप कोरेगांवे व ॲड. प्रवीण मेंगाने यांनी विनामूल्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *