बुमराहचा वनवास संपणार तरी कधी? मिळाली गुडन्यूज, आता…

(sports news) टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा कधी मैदानात उतरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आगामी वर्ल्ड कप संघात बुमराहला स्थान मिळणार की नाही? यावरून अनेक चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय.

शस्त्रक्रिया

बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो जवळपास एक वर्ष मैदानापासून दूर होता. आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत बुमराह कमबॅक करणार की नाही? अशी चर्चा सुरू होती.

7 ओव्हर गोलंदाजी

जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आता एनसीएमध्ये ट्रेनिंगला असताना दिवसाला 7 ओव्हर गोलंदाजी करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता तो येत्या काही दिवसात 10 ओव्हर पूर्ण करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फिटनेसवर लक्ष ठेवावं लागणार

बुमराहला झालेल्या दुखापतीचे स्वरूप पाहता फिट होण्यासाठी कालमर्यादा घालणं योग्य ठरणार नाही. तुम्हाला कायम त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवावं लागणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिली आहे. (sports news)

रवी शास्त्री म्हणतात…

जसप्रीत बुमराच्या पुनरागमनाची घाई करू नका, अन्यथा त्याची अवस्था शाहीन आफ्रिदीसारखी होईल, असा सल्ला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *