लोकराजा लघु चित्रपट महोत्सव या शोमध्ये कास्टिंग डायरेक्टर अक्षय पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

पत्रकार नामदेव निर्मळे

(local news) जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील लोकराजा राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव 2023 यामध्ये जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर आयोजित शाहू महाराज जयंती निमित्त कलेला राजाश्रय देणाऱ्या या लोक राजाला आणि त्यांच्या पुरोगामी विचारांना लघु चित्रपट महोत्सव द्वारे दिली जाणारी या मानवंदनेत. ए.पी.फिल्मचे मालक मा. अक्षय पाटील यांना लोकराजा शाहू महाराज सन्मान २०२३ पुरस्कार प्राप्त झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर माजी सांस्कृतिक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राहुल रेखावार साहेब जिल्हाधिकारी कोल्हापूर, सत्कारमूर्ती मा.प्रवीण तरडे लेखक, दिग्दर्शक, निर्माता, प्रमाणपत्र वितरण हस्ते मा. अध्यक्ष महोत्सव समिती संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आला.

अक्षय पाटील यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. अतिशय संकटांना तोंड देत त्यांनी अनेक मालिकेमध्ये मालिकेतून अनेकांना काम दिले आहे. यावेळी अभिनेते गौरी कचरे पाटील उपस्थित होते.सर्वत्र यांचे कौतुक होत आहे. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *