त्याच्यासाठी शुभमन गिलचा पत्ता कट होणार? टीम इंडियात दिसेल मोठा बदल

(sports news) टीम इंडियाचा जवळपास तीन आठवड्यांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. पुढच्या दोन आठवड्यात टेस्ट चॅम्पियनशिपची नवीन सायकल सुरु होईल. नव्या चॅम्पियनशिप सायकलपासून टीम इंडियात बदलाचा काळ सुरु होईल. वेस्ट इंडिज दौऱ्यात टेस्ट सीरीजपासून बदल दिसू लागतील. याचा परिणाम भारताच भविष्य म्हटल्या जाणाऱ्या शुभमन गिलवर सुद्धा होऊ शकतो.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया 12 जुलैपासून दोन टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीमची निवड झालीय. टीमचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला ड्रॉप करण्यात आलय. त्याच्याजागी 21 वर्षाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला संधी दिलीय. यशस्वीला संधी मिळाल्यानंतर त्याचा टीम इंडियात शुभमन गिलच्या जागेवर परिणाम होऊ शकतो.

परदेशात कसा आहे परफॉर्मन्स?

शुभमन गिल टीम इंडियात आल्यापासून प्रत्येक फॉर्मेटमध्ये टीमसाठी ओपनिंग करतोय. वनडे आणि टी 20 मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलय. पण टेस्टमध्ये तो जास्त प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. खासकरुन परदेश दौऱ्यात त्याने टेस्ट सीरीजमध्ये म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. गिल आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळलाय. यात त्याने 32 च्या सरासरीने 921 धावा केल्या आहेत. फक्त एका इनिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर 47 रन्स सोडल्यास, अन्य मॅचमध्ये ओपनिंग केलीय.

शुभमनला जागा सोडावी लागणार?

वेस्ट इंडिज दौऱ्यात स्थिती बदलू शकते, असं म्हटल जातय. जैस्वालला टीम इंडियात स्थान मिळू शकतं. तो शुभमन गिलच्या जागी रोहित शर्मासोबत ओपनिंगला येऊ शकतो. जैस्वाल मागच्या वर्षभरापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. टी 20, वनडे फॉर्मेट किंवा दुलीप ट्रॉफी असो त्याने प्रत्येक ठिकाणा खोऱ्याने धावा केल्या आहेत. (sports news)

मग, आश्चर्य वाटणार नाही

फर्स्ट क्लास करियरमध्ये यशस्वी जैस्वालाने आतापर्यंत 80 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. जैस्वालने ओपनिंग करताना धावा केल्या आहेत. त्यामुळे तो या जागेसाठी पहिली पसंत असू शकतो. जैस्वालला वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेस्ट डेब्युच नाही, कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंगची जबाबदारी मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

शुभमन कुठल्या नंबरवर येणार?

सहाजिकच शुभमन गिलचा पत्ता कापला जाणार ? असा प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो. याच उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. त्याचा पत्ता कट होऊ शकतो. तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होणार नाही. पण चेतेश्वर पुजाराला ड्रॉप केल्यानंतर तिसऱ्या नंबरची जागा रिक्त आहे. त्या पोझिशनवर त्याला संधी मिळेल.

शुभमन गिलने टेस्ट डेब्यु करण्याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘इंडिया ए टीम’कडून खेळताना मिडल ऑर्डरमध्ये सर्वाधिक फलंदाजी केलीय. तिथे त्याने खोऱ्याने धावा केल्यात. त्यामुळे गिल पुन्हा एकदा मीडल ऑर्डरमध्ये खेळताना दिसेल. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *