भारतीय क्रिकेटसाठी दिवाळीत बीसीसीआयचं मोठं प्लॅनिंग!

(sports news) 2023 चा एकदिवसीय विश्वचषक यावेळी भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत आणि 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत.

दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी महिला प्रीमियर लीगच्या आयोजनाबाबत माहिती दिली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीच्या यशानंतर आता बीसीसीआय दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनासाठी वेळापत्रक तयार करणार आहे. बीसीसीआय दिवाळीच्या वेळी WPL चे वेळापत्रक जाहीर करण्याचा विचार करत आहे.

यावेळेस जगातील सर्वात मोठी टूर्नामेंट म्हणजेच ICC वर्ल्ड कप दिवाळीच्या दरम्यान भारतात आयोजित करण्यात येणार आहे. वास्तविक यावेळी दिवाळी 12 नोव्हेंबरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. (sports news)

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये मुंबई संघाने बाजी मारली. WPL च्या पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे एकूण 5 संघ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *