नीरज चोप्रानं पुन्हा एकदा रचला इतिहास

(sports news) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. नीरजने ‘लॉसने डायमंड लीग’ स्पर्धेत ८७.६६ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले आहे. जर्मनीचा ज्युलियन वेबर ८७.३ मीटर सह दुसऱ्या स्थानावर राहिला. झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचेने ८६.१३ मीटर भाला फेकून तिसरे स्थान पटकावले. नीरजचे या वर्षातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. दोहा डायमंड लीगमध्येही तो सुवर्णपदक विजेता होता.

नीरज चोप्राने पहिल्या फेरीत फाऊलने सुरुवात केली. त्याचवेळी, जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८६.२० मीटर भाला फेकून आघाडी घेतली. पहिल्या फेरीअखेर नीरज पहिल्या तीन खेळाडूंमध्येही नव्हता. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८३.५२ मीटर भाला फेकला. मात्र, दुसऱ्या फेरीअखेरही ज्युलियन आघाडीवर होता. नीरज तिसऱ्या प्रयत्नात ८५.०२ मीटर अंतरावर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. मात्र, तरीही ज्युलियनने आघाडी कायम ठेवली होती. अशा स्थितीत नीरजने चौथ्या प्रयत्नात फाऊल केला. पाचव्या प्रयत्नात, नीरजच्या ‘गोल्डन आर्म’ने आपली जादू चालवली आणि ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेकून पहिले स्थान पटकावले आहे. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरजने ८४.१५ मीटर भाला फेकला. (sports news)

या वर्षातील दुसरे सुवर्णपदक

नीरजचे या वर्षातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. दोहा डायमंड लीगमध्येही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर नीरजचे हे 8 वे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. यापूर्वी त्याने आशियाई स्पर्धा, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक आणि डायमंड लीग यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *