वर्ल्ड कपसाठी संघ निश्चित, ‘या’ तारखेला टीम इंडिया विरुद्ध भिडणार

(sports news) यंदा भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालंय. वनडे वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या मुख्य स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघ हे ठरलेत. तर उर्वरित 2 म्हणजे नवव्या आणि दहाव्या क्रमांकाचे संघ हे वर्ल्ड क्वालिफायरमधून ठरणार आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन्ही संघांना थेट पात्र होण्यात अपयश आलं. त्यामुळे या 2 वर्ल्ड कप विनर संघांवर आयसीसी क्वालिफायर स्पर्धेत खेळण्याची नामुष्की ओढावलीय. झिंबाब्वे इथे आयसीसी वर्ल्ड क्वालिफायर 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे.

या पात्रता स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले होते. त्यामधून 4 संघांचं पॅकअप झालं. त्यानंतर स्पर्धेतील सुपर 6 राउंडला सुरुवात झाली . सुपर 6 राउंडमध्ये शनिवारी 1 जुलै रोजी स्कॉटलँडने मोठा उलटफेर केला. स्कॉटलँडने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने विजय मिळवला. विंडिजचं या पराभवामुळे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कप पात्रता फेरीतच बाजार उठला. वेस्ट इंडिज यामुळे वर्ल्ड कपच्या 48 वर्षात पहिल्यांदाच खेळताना दिसणार नाही. विंडिजला आधी झिंबाब्वे, त्यानंतर नेदरलँड आणि स्कॉटलँड या कमजोर संघांकडून पराभूत व्हावं लागलं.

झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका

विंडिजचा गेम ओव्हर झाल्यानंतर श्रीलंकेचा 2 जुलै रोजी झिंबाब्वे विरुद्ध सामना झाला. झिंब्बावेने या वर्ल्ड कप क्वालिफायर साखळी फेरीत सर्वच्या सर्व एकूण 4 सामने जिंकले. त्यानंतर झिंबाब्वेने ओमानवर सुपर 6 मधील पहिल्या सामन्यातही विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेनेही साखळी फेरीसह सुपर 6 मधील सामन्यातही विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात कडवी झुंज होणार हे निश्चित होतं. (sports news)

सामना बरोबरीचा होता. मात्र श्रीलंकेने झिंबाब्वेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं. श्रीलंका वर्ल्ड कपसाठी क्वालिाफाय करणारी (Q 2) एकूण नववी टीम ठरली आहे. या विजयामुळे आता टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे 12 वर्षांनंतर 2011 वर्ल्ड कपमधील 2 फायनलिस्ट टीम पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने भिडणार आहेत.

सामन्याचा धावता आढावा

श्रीलंकेने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर झिंबाब्वेने शरणागती पत्कारली. झिंबाब्वेकडून सिन विलियम्स याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. तर सिंकदर रजा याने 31 धावा केल्या. तिघांना भोपळा फोडण्यात अपयश आलं. तर उर्वरित 5 जणांना विशीपारही जाता आलं नाही. श्रीलंकेकडून महीश श्रीक्षणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दिलशान मधुशंका याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मथीक्षा पथिराना याने 2 तर कॅप्टन दासून शनाका याने 1 विकेट घेत झिंबाब्वेला 32.2 ओव्हरमध्ये 165 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 166 धावांचं आव्हान मिळालं.

श्रीलंकेची 166 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात झाली. पथुम निसांका आणि दिमुथ करुणारत्ने या दोघांनी 103 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र नागवेरा याने ही जोडी फोडली. नागवेराने दिमुथला 30 धावांवर आऊट केलं. त्यानंतर कुसल मेंडिस आला. या जोडीने श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान पथुमने शतक पूर्ण केलं. पथुमने 102 बॉलमध्ये 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर कुसलने नॉट आऊट 25 धावांची खेळी केली.

टीम इंडिया-श्रीलंका आमनेसामने

टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला सातवा सामना हा श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे. वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झालं तेव्हा टीम इंडिया विरुद्ध क्वालिफायर 2 टीम असा सामना होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा क्वालिफायर 2 टीम ठरली नव्हती. पण आता श्रीलंका ही क्वालिफायर 2 टीम ठरलीय. त्यामुळे गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत.

टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक

आता एका जागेसाठी दोघांमध्ये रस्सीखेच
दरम्यान श्रीलंकेने वर्ल्ड कप मुख्य स्पर्धेत क्वालिफाय केल्याने आता फक्त 1 जागा शिल्लक राहिली आहे. या एका जागेसाठी झिंबाब्वे आणि स्कॉटलँड यांच्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. झिंबाब्वेच्या 6 तर स्कॉटलँडच्या खात्यात 4 पॉइंट्स आहेत. स्कॉटलँडचा रनरेट झिंबाब्वेच्या तुलनेत चांगला आहे. झिंबाब्वे विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात 4 जुलैला सामना पार पडणार आहे. हा सामना जिंकणारी टीम वर्ल्ड कप 2023 च्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरेल. त्यामुळे श्रीलंकेनंतर कोणती टीम वर्ल्ड कपमध्ये धडक मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन | क्रेग एर्विन (कॅप्टन), जॉयलॉर्ड गुम्बी (विकेटकीपर), शॉन विल्यम्स, वेस्ली माधेवरे, सिकंदर रझा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रॅड इव्हान्स, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दासुन शानाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थीक्षाना, दिलशान मदुशंका आणि मथीशा पाथिराना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *