रविवारी ‘शिक्षण संवाद: तिरकस आणि चौकस’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
जयसिंगपूर /प्रतिनिधी:
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार लिखित ‘शिक्षण संवाद: तिरकस आणि चौकस’ या पुस्तकाचा प्रकाशन (publication) समारंभ रविवार दि. 16 जुलै रोजी होत आहे. जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
यावेळी प्रा. वसंत केशव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. विजय चोरमारे, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. अंगणवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाच्या प्रश्नांची क्ष- किरण चिकित्सा करणारे हे पुस्तक असून शिक्षणासंदर्भातील वेगवेगळ्या प्रश्नांसोबतच विविध विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न लेखक प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केला आहे.
हा समारंभ दि.16 जुलै रोजी सकाळी दहा वाजता जयसिंगपूर महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात होणार आहे. या प्रकाशन (publication) समारंभास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी केले आहे.