वृषभ राशी भविष्य
यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषत: आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते.
आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील. उत्तम दिवस आहे. सिनेमा, पार्टी आणि मित्रांसोबत फिरण्याची शक्यता आहे.