वृश्चिक राशी भविष्य
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. इतरांच्या कामात नाक खूपसणे आज टाळले तर बरे. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा.
महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.