सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर
बाजारातून कढीपत्ता (curry leaves) आणला की त्याची पानं वेगळी करुन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एका सुती कपड्यावर पंख्याखाली पानं सुकत घाला.
आता ते चांगले पुसून एका एअर टाइट डब्यात टिश्यू पेपर टाकून त्यावर हे कढीपत्ता ठेवा. शिवाय वरूनदेखील एक टिश्यू पेपर ठेवा आणि आता हा डबा फ्रिजमध्ये ठेवा.
जर तुमच्याकडे एअर टाइट डबा नसेल तर झीप लॉक प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू शकता. मात्र या बॅगेतून कढीपत्ता काढताना बॅग लॉक व्यवस्थित झाली आहे का हे नक्की तपासा.
कढीपत्ता (curry leaves) सुकतो म्हणून तुम्ही फेकून देता तर असं न करता त्याची पावडर बनवून ठेवा. या पावडरचेही अनेक फायदे आहेत.
कढीपत्त्याचे फायदे
करी पावडर ही अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असते. या पावडरच्या सेवनाने जळजळ दूर होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कढीपत्तामधील लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे ए आणि सी हे आरोग्यासाठी वरदान असतं.