बासमती तांदळाचे 7 आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का?
बासमती तांदूळ (Basmati rice) हा एक अतिशय लोकप्रिय असा तांदूळ आहे. जिरा राईस, बिर्याणी, पुलाव या खास पदार्थ्यांसाठी आपण बासमती तांदूळाचा उपयोग करतो.
पण या बासमती तांदूळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
* बासमती तांदूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. बासमती तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असल्याने
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
* बासमती तांदळात (Basmati rice) फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या पचनाच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
* बासमती तांदळात ब जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात असल्याने ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
* बासमती तांदूळ वजन कमी करण्यासही खूप फायदेशीर आहे. यातील फायबरमुळे तुम्हाला भूक लागत नाही.
* बासमती तांदळात लोह, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि तांबं यांसारख्या खनिजे असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय
उपयुक्त आहेत.